नुकतीच कार्तिक पौर्णिमा झालेली असून आता लग्नाचे मुहूर्त निघायला सुरुवात होणार..ह्या वर्षी लग्नाच्या सनई बरोबरच निवडणुकीचे बिगुलपण वाजणार आहे ..हिमाचल प्रदेश आणि गुजराथ मधे निवडणूक जाहीर झालेल्या असून सगळी कडे त्याच्या चर्चा रंगल्या आहे..त्यातच लग्नाच्या दिवशी निवडणूक असल्या म्हणजे कोणी कुठे जायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो सीतापूर मधे एका छोट्या व्यापाऱ्यांचा घरी निवडणुकी च्या दिवशी त्याच्या मुलाच्या लग्नाची तारिक निश्चित करण्यात आली..त्यांनी ह्या गोष्टीला चांगला संयोग मानत पत्रिके मधे असा मजकूर छापला कि लग्नाला जरूर या पण आधी आधी वोट द्यायला जा..मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि तो बजावला गेला पाहिजे असे वर आणि वधू पक्षाचे म्हणणे आहे..त्यांनी पत्रिके वर असे लिहायचे कारण असे सांगितले कि लोकांना ह्या करता जागरूक असणे आवश्यक आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews